‘घाचर-घोचर’ आता फक्त पाच लोकांनाच माहीत आहे. आणि त्यात मी एक आहे...
तो तिच्या माहेरी तयार झालेला शब्द होता. ती नि तिचा भाऊ दोघांनी मिळून बनवलेला नवीन शब्द. लहान असताना ती व तिचा भाऊ एका संध्याकाळी गच्चीत पतंग उडवत होते. हिच्या हातात पतंगाच्या मांज्याचे गुंडे होते व ती ते फिरवत खेळत होती. इतक्यात गुंड्यातले दोरे एकमेकात मिसळून गुंतून बसले. दोन्ही मुलं त्या गुंत्यात अडकून बसली होती. तो गुंता सुटत नसल्यानं तिचा भाऊ, रागारागानं व निराशेनं म्हणाला, ‘इथे तर सगळं घाचर घोचर झालंय’........